फोटो, (ABD26J82282) सिडको ः गीता भवन येथे स्फूर्ती महिला मंडळातील सदस्यांसह विविध वेशभूषेत असलेल्या महिला.
--
वेशभूषेतून संस्कृतीचे दर्शन, गीतांतून सुरांची बरसात
सिडको, ता. २९ ः स्फूर्ती महिला मंडळातर्फे गीता भवन येथे देवत्वापासून समाज प्रबोधनापर्यंतच्या विविध भूमिका साकारत महिलांनी आपल्या कलागुणांना मंच मिळवून दिला. कुणी संतपरंपरेतील व्यक्तिमत्त्व साकारले, तर कुणी ऐतिहासिक स्त्रीशक्तीची ओळख करून दिली. या वैविध्यपूर्ण वेशभूषा सादरीकरणानंतर कोजागरीच्या चांदण्यात जुन्या हिंदी-मराठी गीतांनी मैफलीत रंग भरला. स्फूर्ती महिला मंडळाचा शारदोत्सव, कोजागरीनिमित्त दोनदिवसीय कार्यक्रम उत्साहात पार पडला.
उत्सवादरम्यान अध्यक्ष मीरा पत्की, उपाध्यक्ष ऊर्मिला मगर व सचिव सुमेधा हुमनाबादकर यांनी शारदेची पूजा व आरती केली. चित्रा पिलखाने यांनी ‘अवली’, वृषाली बांते यांनी ‘नटसम्राट’मधील ‘कावेरी’, वंदना आचार्य यांनी ‘मंथरा’, निर्मला सांबरे यांनी ‘पंजाबी बाई’, विभा श्रीवास्तव यांनी तमाशा कलावंत , सुवर्णा चोबे यांनी राजमाता जिजाऊ, सीमा पाठक यांनी सावित्रीबाई फुले, सुविधा तेरकर यांनी हास्यजत्रेतील ‘लाली’, नलिनी कुलकर्णी यांनी संत मीरा यांच्या वेशभूषा सादर केल्या. त्यानंतर बुधवारी (ता. २८) पार पडलेल्या मैफलीत विविध गीते सादर केली. ‘भैरवी’ने कार्यक्रमाची सांगता झाली. सुमेधा हुमनाबादकर यांनी सूत्रसंचालन केले. वीणा म्हैसेकर यांनी आभार मानले.