
छत्रपती संभाजीनगर : सैनिकी सेवापूर्व संस्थेतील (एसपीआय) प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी (ता.१९) सुरवात झाली असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू होणारी प्रक्रिया डिसेंबरमध्येच सुरू झाली. नाशिक येथील मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेबाबतच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.