esakal | औरंगाबादच्या मसाल्याची दमण-दिवला लागली गोडी; नोकरी सोडून सुरु केला होता स्टार्टअप
sakal

बोलून बातमी शोधा

shweta jadhav

तीन ते पाच महिलांना यात गृहउद्योगातून रोजगारही मिळवून दिला आहे

औरंगाबादच्या मसाल्याची दमण-दिवला लागली गोडी; नोकरी सोडून सुरु केला होता स्टार्टअप

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्वत:चा काहीतरी उद्योग-व्यवसाय असावा याच हेतूने औरंगाबाद येथील श्‍वेता जाधव-वरकड यांनी मसाले बनविण्याचे नवीन स्टार्टअप सुरु केले. आपल्या मराठवाडी पध्दतीने गोडा मसाल्याला अल्पवधीतच मोठी मागणी होऊ लगली. थेट दमण-दिव येथून या मसाल्यास मागणी होत आहेत.

गेल्या चार महिन्यात सुरु झालेल्या या गृह उद्योगाने आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्‍वेता जाधव यांनी एमबीए केले आहे. त्यानंतर एका कंपनीत एच आर डिपार्टमेट मध्ये नोकरी केली. त्यानंतर स्वत:चे काहीतरी असावेत याच उद्देशाने मसाले बनविण्याचे गृहउद्योग सुरु केला.

दरवर्षी 'या' गावात जावयाची गाढवावरून काढली जाते मिरवणूक; कोरोनामुळे...

सुरुवात छोट्यापासून केली. त्यानंतर शिक्षण, नोकरीचा अनूभवाचा फायदा घेत, सोशल मिडीयावरून मसाल्याची मार्केटिंग केली. यातून अनेक ऑडर्स मिळू लागल्या. तीन ते पाच महिलांना यात गृहउद्योगातून रोजगारही मिळवून दिला आहेत. दमण- दिव येथून सोशल मिडियावरून थेट मसाल्याची ऑर्डर आली. कुरिअरच्या माध्यमातून हा मसाला पाठविण्यात आला आहे.