

3800 km Narmada Parikrama on foot
कन्नड : थंडी, वारा, पाऊस यांची कुठलीही तमा न बाळगता सलग पावणे चार महिने तब्बल ३ हजार ८०० किलोमीटरचा पायी प्रवास करत कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील नवनाथ रंगनाथ वाघचौरे यांनी आपली तिसरी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली. नर्मदा परिक्रमा पूर्ण करून रविवारी (ता. ११) सकाळी दहा वाजता औराळा फाट्यावर त्यांचे आगमन होताच कुटुंबीय, ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग गात त्यांचे उस्फुर्त असे स्वागत केले. सलग तीन वर्षांपासून नवनाथ वाघचौरे नर्मदा परिक्रमा करीत असून मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथून विजयादशमीच्या पावन दिनी सुरू झालेली ही नर्मदा फेरी पुन्हा ओंकारेश्वर येथेच पायी प्रवास करून पूर्ण होते.