SSC Supplementary Exam : दहावी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Board Exam 2025 : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी (एसएससी) पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित शुल्कासह २४ मे आणि विलंब शुल्कासह २९ मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
SSC Supplementary Exam
SSC Supplementary Examsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १५ ते २४ मे पर्यंत; तर विलंब शुल्कासह २५ ते २९ मेपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे राज्य मंडळातर्फे कळवण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com