Chh. Sambhajinagar News: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी ३३ एसटी बस एकाच दिवशी रवाना!
Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाने पंढरपूरच्या यात्रेसाठी १३५ अतिरिक्त बस सोडण्याची तयारी केली आहे. वाढत्या गर्दीनुसार एसटी महामंडळाने विशेष व्यवस्था केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळ सज्ज झाले. गुरुवारी (ता. तीन) जिल्ह्यातून सायंकाळपर्यंत ३३ एसटी बस पंढरपूरसाठी रवाना करण्यात आल्या, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.