घरमालकावर चाकूने हल्ला!
छत्रपती संभाजीनगर : भाडेकरूकडे आलेल्या तिघांना घरात धिंगाणा घालण्यास आणि शिवीगाळ करण्यास मज्जाव केल्याने घरमालकावरच चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (ता. एक) घडली. राजेश आण्णा शिंदे (वय ४३, व्यवसाय मजुरी) असे जखमीचे नाव आहे. रोहन दत्ता आव्हाड आणि रोहित कांबळे (दोघेही रा. विश्रांतीनगर) यांनी राजेश शिंदे यांना पकडून ठेवले, तर त्यांच्यासोबतच्या एका अनोळखी इसमाने चाकूने त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराखाली वार करून जखमी केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास सहायक फौजदार कोंडके करत आहेत.
------
कौटुंबिक वादातून दोन्ही गटांत मारहाण
छत्रपती संभाजीनगर : जोगेश्वरी येथील आंबेडकरनगर परिसरात मातोश्री हॉटेलसमोर कौटुंबिक वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना (ता.२९) घडली. अफजल सरदार शेख (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शकील शेख याने लाकडी दांड्याने अफजल आणि त्यांचा भाऊ अहमद यांना मारहाण करून जखमी केले. तसेच हसीना शेख हिने अफजल यांच्या पत्नी सुलताना यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमन शेख आणि अरमान शेख यांनी संगनमत करून अजीज व इस्माईल यांना मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश सांगळे हे करीत आहेत.