
धाराशिव : ‘हॅलो मी बॅंकेतून बोलतोय... हॅलो मी कस्टम डिपार्टमेंटमधून बोलतोय... मी कंपनीतून बोलतोय... असे सांगून कोणी तुमच्या बॅंक खात्याविषयी, युपीआय अॅप, क्रेडिट, ओटीपीसंबंधी माहिती विचारली तर मोबाईलधारकांनो सावधान... अशी कोणतीही माहिती देऊ नका, अन्यथा तुमचे बॅंक खाते रिकामे होऊ शकते. अशी फसवणूक टाळण्यासाठी सतर्कता बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.