स्टरलाइट टेक्नॉलॉजीजची हरित ऊर्जेकडे झेप

स्टरलाइट टेक्नॉलॉजीजची हरित ऊर्जेकडे झेप
Published on: 
स्टरलाइटचे चारही प्रकल्प हरित ऊर्जेवर कार्बन उत्सर्जनात ६५ टक्के कपातीचे उद्दिष्ट छत्रपती संभाजीनगर, ता. २१ : स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (एसटीएल) छत्रपती संभाजीनगरमधील चारही उत्पादन प्रकल्पांत वीजपुरवठ्यासाठी १०० टक्के हरित ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. पारंपरिक जीवाश्म इंधनावर आधारित वीजपुरवठ्याऐवजी पवन आणि सौरऊर्जेतून मिळणाऱ्या विजेचा वापर करण्यात येत असून, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) माध्यमातून हे स्थित्यंतर शक्य झाले आहे. या बदलामुळे संबंधित प्रकल्पांच्या कार्बन उत्सर्जनात सुमारे ६५ टक्के घट अपेक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने ऑप्टिकल फायबर निर्मिती प्रक्रियेतही हरित हायड्रोजनचा वापर सुरू केला आहे. काच निर्मितीच्या ऊर्जा-केंद्रित प्रक्रियेत १०० टक्के हरित हायड्रोजनचा वापर करण्यात येत आहे. या प्रक्रियेत यापूर्वी पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा वापर होत होता. त्यामुळे ऑप्टिकल फायबर निर्मिती साखळीतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे. एसटीएलच्या ऑप्टिकल फायबरच्या कार्बन फूटप्रिंटमध्ये लक्षणीय घट झाली आहे. डेटा सेंटर आणि दूरसंचार नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या फायबरच्या प्रत्येक किलोमीटरमागील कार्बन उत्सर्जन ४.७ किलो पातळीवरून ०.९ किलोपर्यंत खाली आले आहे. म्हणजेच उत्सर्जनात ८० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. यामुळे डिजिटल पायाभूत सुविधा उभारणाऱ्या ग्राहकांनाही पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होत आहेत. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांना प्रोत्साहन कंपनीने कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या वाहनांचा वापर वाढविण्यासाठी कर्मचारी वाहन धोरणातही बदल केले आहेत. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहने निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन आणि वाहन खरेदीसाठीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. (कोट) एसटीएलमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी लागणाऱ्या विजेपासून ते प्रत्येक किलोमीटर ऑप्टिकल फायबरच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि कर्मचाऱ्यांसाठीच्या धोरणांपर्यंत प्रत्येक स्तरावर आम्ही बदल घडवत आहोत. नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि पर्यावरणपूरक उत्पादनांमधील नवोपक्रम यांची सांगड घालून अधिक हरित आणि पर्यावरणपूरक उत्पादन व्यवस्था उभारण्याच्या दिशेने आम्ही मोजता येण्याजोगी प्रगती करत आहोत. -राहुल पुती, मुख्य कार्यकारी अधिकारी, ओएनबी विभाग, एसटीएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com