esakal | शद्बांपेक्षा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवीय मदत, आश्वासन बस्स! |Rain Affected Farmers In Marathwada
sakal

बोलून बातमी शोधा

पाचोड (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने बागांमध्ये पाणी साचले आहे.

शद्बांपेक्षा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवीय मदत, आश्वासन बस्स!

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) म्हणतात, मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई देणे शक्य नाही. ठिक आहे. पण त्यांच्या हक्काचे जे आहे ते तरी त्यांना द्या. मुंबईत बसून मराठवाड्यातील अतिवृष्टीने (Rain Hit Marathwada) जे मोठे नुकसान केले आहे त्याची दाहकता कळणार नाही. दुसरे अनेक ठिकाणी अद्यापही नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. ती तातडीने करावे. सर्व बाजूंनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आज आधार देण्याची गरज आहे. या भागातील शेतकरी (Farmers) नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी रस्त्यावर उतरत आहे. जालन्यातील घनसावंगत शेतकऱ्यांनी हलगी मोर्चा काढून तहसील कार्यालयाला घेराव घातला होता. तसेच औंढ्यात सिद्धेश्वर धरणाचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी औंढा-जिंतूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते.

हेही वाचा: वृक्षतोड बंदीला शेतकरी संघटनेचा विरोध

त्यांना लवकर नुकसान भरपाई हवी आहे. शेतकरी संघटनेच्या वतीनेही आंदोलन करण्यात आले आहे. पोकळ शद्बांचे आश्वासन नको आहे. त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. या अतिवृष्टीत माणसांबरोबर जनावरांचाही मृत्यू झाला आहे. अशा अतिवृष्टीने कमीत-कमी जीवित हानी होईल यावर काम करण्याची गरज आहे. मराठवाड्यात पाणी, पर्यावरणावर काम करणारे अनेक तज्ज्ञ आहेत. त्यांची मदत घ्यायला हवी. शासनाने संवेदनशीलता दाखवून लवकर अतिवृष्टीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत करायला हवे.

loading image
go to top