Clash in Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर दोन गटांत तुफान दगडफेक, १३ गंभीर; पोलिसांकडून अश्रुधूर, बळाचा वापर

पडेगाव, कासंबरी दर्गा भागात किरकोळ कारणावरून कादियानी आणि सुन्नी पथींयाच्या दोन गटांत सोमवारी (ता. २२) तुफान दगडफेक, लाठाकाठ्या, रॉडने मारामारी झाली.
stone pelting in two groups Padegaon Kasambari Dargah area 13 serious injured
stone pelting in two groups Padegaon Kasambari Dargah area 13 serious injured
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पडेगाव, कासंबरी दर्गा भागात किरकोळ कारणावरून कादियानी आणि सुन्नी पथींयाच्या दोन गटांत सोमवारी (ता. २२) तुफान दगडफेक, लाठाकाठ्या, रॉडने मारामारी झाली. दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला. जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर आणि हँडग्रेनेडचा वापर केला. घटनेनंतर दोन्ही गटांमिळून ६३ संशयितांना अटक केली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगलीचा गुन्हा नोंद झाला. या घटनेत १३ जण गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी पहिल्या गटाच्या वतीने शेख आरेफ शेख उस्मान (वय ४३, रा. पडेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा ः आरेफ यांचा भाऊ लतीफ हा पडेगाव भागातच गट क्रमांक ९२ मध्ये राहतो. या गटाच्या शेजारी असलेल्या गट क्रमांक ९१ मध्ये कादियानी पंथाची वस्ती आहे. आरेफला भावाच्या घरी जाण्यासाठी गट क्रमांक ९२ मधूनच जावे लागते.

सोमवारी दुपारी कादियानी समाजाच्या जमावाने ‘आमच्या वस्तीतून का येणे-जाणे करता?’ असे म्हणत आरेफ आणि इतरांवर लाठ्याकाठ्या, रॉड, तलवारीने हल्ला करीत दगडफेक केली. या प्रकरणी आरेफ यांच्या तक्रारीवरून ५० जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी पोलिसांनी ३७ संशयितांना अटक केली.

stone pelting in two groups Padegaon Kasambari Dargah area 13 serious injured
Mumbai Pune Traffic Update : 'पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे'वरील वाहतुकीत आज महत्वाचे बदल! जाणून घ्या पर्यायी मार्ग

याच प्रकरणात दुसऱ्या गटाच्या वतीने मोहम्मद झिशान नजर मोहम्मद (वय ३५, रा. पडेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा ः त्यांच्या घराजवळ काही मुले येऊन बसत होती. सोमवारी दुपारी झिशान त्यांना समजावून सांगत असताना एका मुलाने आईला बोलावून आणले. यावेळी वाद झाल्याने दुसऱ्या गटातील जमावाने झिशान आणि इतरांवर हल्ला करीत दगडफेक केली. या प्रकरणी शंभर ते सव्वाशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये २७ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या दंगलीमध्ये तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत.

stone pelting in two groups Padegaon Kasambari Dargah area 13 serious injured
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासाठी दान केलं 101 किलो सोनं! सुरतमधील 'हा' व्यापारी आहे तरी कोण?

पोलिसांनी धाव घेतल्याने टळला अनर्थ

या दंगलीची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनाही दंगेखोर जुमानत नव्हते. उपायुक्त बगाटे यांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूर तसेच हँडग्रेनेडचा वापर करीत लाठीमार केला. यानंतर संशयित दंगेखोरांना ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com