आईच्या अंत्यसंस्कारानंतर दिला १० वीचा पेपर, परीक्षेसाठी आईने दिलेला शर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

student give ssc exam after lost his mother and funeral

आईच्या अंत्यसंस्कारानंतर दिला १० वीचा पेपर, परीक्षेसाठी आईने दिलेला शर्ट

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी मातेचे निधन झाले. त्यातच दहावीची परीक्षा सुरू. तो रडला... दुःखी झाला... पण त्याने लगेच स्वतःला सावरले. द्विधा मनःस्थितीतही त्याने धैर्य राखून दहावीचा पेपर दिला.

अक्षत दत्तात्रेय दुरतकर (वय १५) या विद्यार्थ्याच्या आईचे रविवारी (ता. १३) अचानक निधन झाले. शोकाकुल वातावरणात जड अंतःकरणाने आईवर अंत्यसंस्कार केले. एकीकडे आई गेल्याचे दुःख आणि दुसरीकडे आयुष्य घडविणारी परीक्षा अशा द्विधा मनःस्थितीत अक्षतने मंगळवारी (ता. १५) तिसऱ्या दिवसाचा विधी करून मराठीचा पेपर दिला. अक्षतची आई विद्या दुरतकर (वय ४७) या दोन-चार दिवसांपासून सर्दी, तापामुळे आजारी होत्या.

परीक्षेसाठी आईने आणला होता शर्ट

परीक्षेला जाण्यासाठी विद्या दुरतकर यांनी मुलासाठी त्याच्या आवडीचा नवीन शर्ट आणला होता. तो शर्ट घालून मुलगा परीक्षेला जाताना पाहण्याची आईची इच्छा होती. तोच शर्ट घालून अक्षत मंगळवारी परीक्षेला आला होता.

Web Title: Student Give Ssc Exam After Lost His Mother And Funeral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..