औरंगाबाद : विद्यार्थ्यांनो...सोशल मीडिया वापरताय जरा काळजी घ्या

दामिनी पथकातर्फे एमजीएमच्या चारशेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
औरंगाबाद : विद्यार्थ्यांनो...सोशल मीडिया वापरताय जरा काळजी घ्या
औरंगाबाद : विद्यार्थ्यांनो...सोशल मीडिया वापरताय जरा काळजी घ्याsakal

औरंगाबाद : व्हॉटस्ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यासारखी सोशल मीडियावर वावरताना आपला आयडी पासवर्ड कोणाला देऊ नका, आक्षेपार्ह टिपण्या (कमेंट) करू नका, प्रत्येक ९० दिवसांनंतर पासवर्ड बदलत राहा, असे आवाहन दामिनी पथकाच्या प्रमुख सुवर्णा उमाप यांनी महात्मा गांधी नर्सिंग महाविद्यालयात केले.

पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गीते, सहायक आयुक्त विशाल ढुमे, महिला भरोसा केंद्राच्या निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता.११) रोजी एमजीएमच्या नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दामिनी पथकातर्फे करण्यात आले होते. यावेळी श्रीमती उमाप बोलत होत्या.

औरंगाबाद : विद्यार्थ्यांनो...सोशल मीडिया वापरताय जरा काळजी घ्या
औरंगाबाद : इच्छुकांचे प्रभागरचना आराखड्याकडे लक्ष

यावेळी त्या म्हणाल्या की, कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी आधी ध्येय निश्चित करा, ही करिअरची पहिली पायरीच असते, करिअर निश्चिती झाली की, त्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, मेहनतीची तयारी ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला. सायबर क्राइम म्हणजे काय, तो कसा होतो, महिलाविषयक कायदे कोणते आहेत, सोशल मीडियाचा वापर कसा करावा, रॅगिंग झाल्यास काय करावे, सार्वजनिक, एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन केले.

यासोबतच शहर पोलिस दलातर्फे महिला व मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत श्रीमती उमाप यांनी माहिती दिली. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवृंद यांना अडचणी आल्यास तत्काळ पोलिसांची मदत घ्यावी हे सांगतानाच अधिक मदतीसाठी ११२ हा टोल फ्री क्रमांकासह शहर पोलिस नियंत्रण कक्षाचा ०२४० -२२४०५०० यावरही संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी दामिनी पथकातील लता जाधव, आशा गायकवाड, गिरिजा आंधळे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला एमजीएमच्या प्रशासक प्रेरणा दळवी, विद्या राणी, श्री. आंधळे, श्री. सतीश यांच्यासह चारशेवर विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com