esakal | students during lockdown increase use of mobile phone covid19 corona schools close
sakal

बोलून बातमी शोधा

students during lockdown

शाळा बंदमुळे पालकांच्या चिंतेत वाढ अभ्यासाकडे मुलांचे दुर्लक्ष

sakal_logo
By
प्रमोद सरवळे, संदिप लांडगे

औरंगाबाद: मागील एक वर्षापासून मुलांच्या शाळा बंद, परीक्षा देखील रद्द झाल्या आहेत. याचा थेट परिणाम शिक्षणावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. सुरवातीला ऑनलाइन शिक्षण सुरु होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे शिक्षण देखील शाळांकडून विद्यार्थ्यांना देणे बंद झाले आहे. त्यामुळे बालवयात शिक्षणावाचून मुलांची होणारी परवड पालकांच्या चिंतेत वाढ करीत आहे.

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या शाळा मागील एक वर्षापासून शांत झाल्या आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी डिजिटल साधनांच्या माध्यमातून शाळा बंद पण् शिक्षण सुरु हा पर्याय नव्याने समोर आला. मात्र, या ऑनलाइन शिक्षणात दुर्गम, ग्रामीण भागातील मुलांना तांत्रिक अडचणींचा जास्त सामना करावा लागला.

शहरी भागात तांत्रिक अडचणी नसल्या तरी दररोज मोबाईल, टॅबकडे एकटक पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर मोठा परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. मागील एक महिन्यापासून कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सुरु झालेल्या शाळा शासनाने पुन्हा बंद केल्या. त्यानंतर बहुतांश खासगी, शासकीय, अनुदानित शाळांनी ऑनलाइन शिकवणेही बंद केले आहे. त्यामुळे दिवसभर मुलं आता घरात मोबाईल, टीव्हीसमोर आपला वेळ घालवताना दिसत आहेत. मुलांच्या भविष्याची होणारी फरफट पालकांना न पाहणारी आहे

गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइनच्या नावाखाली शिक्षक दिवसांतून फक्त एक युट्यूबची लिंक पाठवतात. मुलांचे ऑनलाइन क्लास बंद आहे. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जावू देता येत नाही. त्यामुळे मुलं मोबाईल, टिव्ही समोर दिवसभर वेळ घालवत आहे. पालक कितीही ओरडले तरी मुलं आता अभ्यास करत नाहीत. अभ्यास काय करावा? असा प्रश्‍न विद्यार्थी पालकांनाच विचारतात.

- राजेंद्र सोनवणे, पालक

कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्या. तेव्हापासून ऑनलाइन शिक्षण देखील बंद आहे. अभ्यास काय करावा? कशाचा करावा? गणित, विज्ञान या विषयांमध्ये अडलेले प्रश्‍न आम्हाला सोडवता येत नाही. अद्याप या विषयांचे क्लासच झालेले नाही. शाळेची, मित्रांची खूप आठवण येते, पण अजून किती दिवस शाळा बंद राहणार याचे उत्तर आईवडील देखील देत नाहीत.

- प्रज्ञा कुलकर्णी (विद्यार्थिनी, इयत्ता आठवी)

loading image