एसटीच्या खासगीकरणाचा विद्यार्थ्यांना बसतोय भुर्दंड ई-बसमध्येही शालेय पास लागू करा, आमदार कैलास पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

एसटीच्या खासगीकरणाचा  विद्यार्थ्यांना बसतोय भुर्दंड ई-बसमध्येही शालेय पास लागू करा, आमदार कैलास पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
Published on: 
एसटीच्या खासगीकरणाचा विद्यार्थ्यांना भुर्दंड ई-बसमध्येही शालेय पास लागू करा, आमदार पाटील यांची मागणी सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १७ : नियमित एसटी बसचा पास असूनही ई-बसमध्ये प्रवास नाकारला जात असल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, अतिरिक्त तिकीट काढून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसमध्ये शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वैध शालेय पासच्या आधारे प्रवास करू द्यावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नियमित बसचा अभाव महामंडळामार्फत विद्यार्थ्यांना सवलतीचे शालेय पास दिले जातात. मात्र, अनेक मार्गांवर नियमित एसटी बसेस वेळेवर उपलब्ध नसतात किंवा त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. अशा वेळी शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोचण्यासाठी विद्यार्थ्यांना ई-बसचा पर्याय निवडावा लागतो. मात्र, पास वैध असतानाही ई-बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो किंवा स्वतंत्र तिकीट काढण्याची सक्ती केली जाते. पास असूनही केवळ बसचा प्रकार बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना या सुविधेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची टीका आमदार पाटील यांनी केली. सध्या दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. दररोजचा अतिरिक्त प्रवासखर्च न परवडल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बसमधून उतरवून दिले जाते, ज्यामुळे त्यांना वेळेवर वर्गात पोचता येत नाही आणि त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ....... ((कोट)) ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणासाठी पूर्णपणे एसटी बसवर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आर्थिक अडचण लक्षात घेऊन महामंडळाने ई-बसमध्येही शालेय पास ग्राह्य धरण्याबाबत सर्व आगारांना व अधिकाऱ्यांना तत्काळ निर्देश द्यावेत. - कैलास पाटील, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com