
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील लहान्याच्या वाडीत गिरिजा नदीवर पूल नसल्याने शिक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. थर्माकोलच्या बोटीवर बसून दोरीच्या साहाय्याने नदी पार करावी लागत असल्याने दळणवळण व्यवस्थाही ठप्प झाली आहे. परिणामी अर्ध्या गावाचा संपर्क गिरिजा नदीतील पाण्यामुळे तुटला आहे. या भागात नवीन पूल करण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत.