वाचादोष शस्त्रक्रिया शिबिरात
१७ बालकांवर यशस्वी उपचार
-----
सोनपेठ, ता. १३ (बातमीदार) : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात आयोजित वाचादोष शस्त्रक्रिया शिबिरात २६ बालकांची तपासणी करण्यात आली. यापैकी १७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमामुळे वाचादोष असलेल्या गरजू बालकांना आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध झाली.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा परिषद, परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत चव्हाण यांनी शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. तेजस तांबोळे यांनी बालकांवर शस्त्रक्रिया केल्या.
शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. शिल्पा टाके, डॉ. मन्मथ महाजन, डॉ. मृदुला जबदे, मालपाणी, आरोग्य कर्मचारी मेनका लांडे, वैशाली गाडे, स्वप्निल राठोड, सौरभ चव्हाण, सुधाकर कुकडे, अनिल उपाडे, आशुतोष दुबे, राजाभाऊ भंडारे, सुप्रिया किरवले, सखाराम दातार, राजाभाऊ दातार आणि समाधान बोकरे यांनी सहकार्य केले. यावेळी १०८ रुग्णवाहिका सेवेचे डॉ. संग्राम तळेकर आणि वाहनचालक माणिक काटे उपस्थित होते. उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांच्यासह फड, कांबळे आणि जाधव उपस्थित होते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे वेळेत निदान करून आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले. या शिबिरामुळे वाचादोष असलेल्या १७ बालकांना शस्त्रक्रियेद्वारे उपचाराची संधी मिळाली.