
नवनाथ इधाटे
फुलंब्री तालुक्यातील पाथ्री शिवारात असणाऱ्या खांबाट वस्तीवरील तीन ते अकरा वयोगटातील तीन मुलांना अचानक लुळेपणा आल्याने वस्तीवरील नागरिक धास्तावले आहे. या तिघावरही छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान हा जीबीएस आजाराचा धोका असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे आता या नागरिकात जीबीएस आजाराच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे.