कर्जाच्या हप्त्यांवरून मानसिक त्रास; तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या

कर्जाच्या हप्त्यांवरून मानसिक त्रास; 
तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या
Published on
कर्जाच्या हप्त्यांवरून मानसिक त्रास; तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या ----- नांदेड, ता. १९ ः कर्जाचे हप्ते थकल्याने बँक कर्मचाऱ्यांकडून वारंवार फोन करून शिवीगाळ व मानसिक त्रास दिल्यामुळे एका तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी बँक कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नितीन गौतम सदावर्ते (वय ३०, रा. दीपकनगर, तरोडा बु., नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. दीपक गौतम सदावर्ते यांनी लिंबगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, नितीन यांनी एका राष्ट्रीयकृत बँकेकडून तीन लाख १५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी सुरुवातीचे नऊ महिने कर्जाचे हप्ते भरले. मात्र, वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी मोठा खर्च झाल्यामुळे पुढील हप्ते भरणे शक्य झाले नाही. त्यानंतर बँकेतील समीर, ज्योती नामक व्यक्तींसह अन्य कर्मचाऱ्यांनी फोन करून शिवीगाळ व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून नितीन यांनी १६ सप्टेंबर रोजी वरळखेड शिवारातील रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक बोधनकर तपास करीत आहेत. --- जमिनीच्या व्यवहारावरून एकाची आत्महत्या, चार जणांवर गुन्हा --- नांदेड, ता. १९ ः जमिनीच्या व्यवहारावरून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याने भोकर येथील व्यक्तीने गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चौघांविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. व्यंकटेश सायगौड भुरेवाड (वय ५२, रा. शिवाजी चौक, भोकर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. भुरेवाड यांनी कनका भवन बारच्या जमिनीबाबत मोहम्मद हारून मोहम्मद युसूफ व रमिजोडीन तखोयोडीन इनामदार यांच्यासोबत व्यवहार केला होता. व्यवहारातील रक्कम परत करावी आणि जमीन त्यांच्या नावावर करून द्यावी; अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी देत २८ जुलै ते ५ सप्टेंबरदरम्यान मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या त्रासाला कंटाळून व्यंकटेश भुरेवाड यांनी गोदावरी नदीपात्रात आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नी वसुंधरा भुरेवाड यांच्या फिर्यादीवरून अब्दुल मुबीन अब्दुल वाहेद, मोहम्मद असलम आयुब गांजरगकर, अब्दुल खालेद अब्दुल अजीज आणि शेख फहिम शेख इस्माईल यांच्याविरुद्ध नोंद केला आहे. पोलिस उपनिरीक्षक यामावार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com