Weather Update: आठवडाभर राहणार वादळी वारे, पाऊस; कसे असेल हवामान? जाणून घ्या
Maharashtra Weather : सकाळचा उकाडा आणि दुपारी वादळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळा की पावसाळा असा संभ्रम निर्माण झाला आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि वाढलेले समुद्रतापमान यामुळे हवामान बदलाची ही स्थिती निर्माण झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : सकाळी उकाडा तर दुपारी अचानक ढग येऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या कधी चांगल्या कोसळत आहे तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडून वातावरणात गारवा निर्माण होत आहे.