

Sunetra Pawar Inspects Soybean Crop in Gangakhed
esakal
गंगाखेड : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सोयाबीन पिकावर झालेल्या परिणामाची राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी (ता. २६) प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. मरडसगाव येथील शेतकरी बाबुराव शिंदे यांच्या सर्वे क्रमांक १५१/४ मधील सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी करून पिकाची सद्यस्थिती जाणून घेतली.