
छत्रपती संभाजीनगर : काटेपिंपळगाव (ता. गंगापूर) येथील आजोबाच्या नावे असलेल्या रेशन दुकानाचे प्राधिकारपत्राचे निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी गंगापूरच्या पुरवठा निरीक्षक अधिकारी कांचन नामदेवराव कांबळे (वय ३४) यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली.