Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार
Autism Diagnosis and Support: स्वराज राजपूत (वय १९) ने ऑटिझमवर मात करून चित्रकलेत प्रावीण्य मिळवले. गायनही उत्तम करतो आणि आईचा आधार बनला. जीवनातील संकटे, वडिलांचे निधन आणि संवाद अडचणींवर मात करून त्याने कलात्मक विश्वात आपली छाप सोडली आहे.
छत्रपती संभाजीनगर: संकटांच्या वादळांनी कितीही धडका दिल्या तरी जिद्द आणि बळ असले की नौका पार होतेच, हे स्वराज राजपूत (वय १९) याने सिद्ध केले. तो अवघा एक वर्षाचा असताना वडिलांचे अपघाती निधन झाले.