Target Peak App : शिष्यवृत्तीची तयारी आता सोपी! विद्यार्थी करताहेत ‘टार्गेट पीक ॲप’च्या माध्यमातून कसून सराव
Scholarship Exam : शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टार्गेट पीक ॲप’ सुरू केले आहे, ज्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सोपी झाली आहे. सुमारे आठ हजार विद्यार्थी या ॲपवर परीक्षेची तयारी करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘टार्गेट पीक ॲप’ सुरू करण्यात आले आहे.