शिक्षकदिनी पुरस्काराऐवजी केवळ मानकऱ्यांची नावे जाहीर
--
परभणी ः गुणवंत शिक्षक पुरस्कार यंदाही शिक्षकदिनी प्रदान होऊ शकले नाहीत. दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आज सन २०२५-२६ आणि २०२६-२७ या दोन वर्षांतील पुरस्कारांसाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे जाहीर केली. दोन्ही वर्षांसाठी प्रत्येकी नऊ प्राथमिक शिक्षक आणि दोन महिला विशेष पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे. मात्र, पुरस्कारांचे प्रत्यक्ष वितरण कधी होणार, याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. जिल्हास्तरीय पुरस्कार निवड समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून ही निवड केली. विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रद्धा झिंजुरके यांनी पुरस्कारार्थींची नावे जाहीर केली.
---
जिल्हास्तरावरील महिला विशेष पुरस्कार
१) राधा उषा विलासराव भिसे,,जि.प.प्रा.शा.लोहरा ता.मानवत
२) अर्चना सीमा अनंतराव भारस्वाडकर,जि.प.प्रा.शा.साडेगाव, ता. परभणी.
सन २०२६-२७ च्या पुरस्काराचे मानकरी
तालुका....नाव....शाळा
गंगाखेड....दशरथ मुंढे.... सिरसम
जिंतुर....सुभाष सानप....पांगरी
मानवत....गोपाळ गायकवाड....जंगमवाडी
पालम....सतिश कांबळे....कें.प्रा.शा कन्या पालम
परभणी....ज्ञानेश्वर वाघमारे....सावंगी (खु.)
पाथरी....भारत सावणे....बोरगव्हाण
पूर्णा....बळीराम कदम....धानोरा काळे
सेलू....षडानन देशमाने....वालुर
सोनपेठ....बाबासाहेब कराड....माणिकनगर तांडा
...............................
सन २०२५-२६ च्या पुरस्काराचे मानकरी
तालुका....नाव....शाळा
गंगाखेड....श्रीहरी पवार....सुप्पा
जिंतुर....सोपान खताळ....पाचलेगाव
मानवत....संजय पक्वाने....मानवत
पालम....भागवत पालमटे...पोखर्णी देवी
परभणी....खोब्राजी वाळवटे....बोरवंड (बु.)
पाथरी....पृथ्वीराज धर्मे....बोरगव्हाण
पूर्णा....मारोती कदम....पिंपळगाव लिखा
सेलू....निलेशकुमार पांचाळ....आडगाव दराडे
सोनपेठ....सुशिलकुमार वाघमोडे....शेळगाव