
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रवेश क्षमता शून्य केली. प्रवेश क्षमता स्थगिती रद्द करून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले विद्यापीठाचे नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी अध्यापक आणि शारीरिक शिक्षण महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी तसेच असोसिएशन ऑफ प्रिन्सिपल ॲण्ड टीचर एज्युकेटर या संघटनेतर्फे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी करण्यात आली.