Teacher Recruitment : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतीला सुरवात

पाच हजारांहून अधिक शिक्षकांची पदे भरणार
Pavitra Portal
Pavitra Portalsakal
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर - तब्बल सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर १ सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या ५६९, उर्दू माध्यमाच्या ९६; खासगी अनुदानित शाळांमध्ये पाच हजाराहून पदांची भरती होणार आहे. १ ते ८ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना ‘पवित्र’वर नोंदणी करावी लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिकांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक खूपच कमी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नयेत म्हणून ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता.

पण, आता त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली असून त्या शाळांना भरतीतून नवीन शिक्षक दिले जाणार आहेत. साधारणत: ऑक्टोबरअखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाकडून बिंदुनामावली, संचमान्यतेची प्रक्रिया अंतिम झाल्यावर एकत्रितपणे भरतीला सुरवात होईल.

सध्या ‘पवित्र’वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यात त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील, असे भरतीचे टप्पे आहेत.

गैरप्रकारातील उमेदवारांना बाहेरचा रस्ता

२०१९ च्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केल्यामुळे ज्या उमेदवारांची नावे परीक्षा परिषदेने जाहीर केली आहेत, अशा उमेदवारांना पवित्र पोर्टलमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Visapur teacher recruitment news
Prajakta Sanjay Dane scores an impressive 147 marks in the TAIT examination and secures selection as a teacher in Zilla Parishad Palghar through the Pavitra Portal recruitment process.
Maharashtra Teacher Recruitment
Maharashtra Teacher Recruitment Kuldeep Bodke Selected Through Pavitra Portal at His Former School in Solapur District
Marathi News Esakal
www.esakal.com