
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतील गंभीर प्रकार समोर येत आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारांकडून भरतीच्या मोबदल्यात संस्थाचालकांकडून १० ते १५ लाख रुपये ‘प्लस’ स्वरूपात मागितले जात असल्याचा आरोप उमेदवारांमधून होत आहे.