ABD26J78737
छत्रपती संभाजीनगर ः शिक्षक दिनानिमित्त ‘आरंभ’मध्ये ज्येष्ठ शिक्षिका मधुरा गोरे आणि संस्थापक अंबिका टाकळकर यांच्यासह ‘आरंभ’चे विशेष शिक्षक आणि कर्मचारी.
----
‘आरंभ’च्या शिक्षकांचा गौरव
छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : आरंभ स्वमग्न मुलांच्या शाळेत शिक्षक दिनानिमित्त शनिवारी (ता. पाच) विशेष शिक्षक आणि समुदाय शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. दिव्यांग मुलांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या मधुरा गोरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी शिक्षक पल्लवी सोनवणे, श्वेता शिंदे, नीलिमा वावरे, शीतल बोडखे, विजयश्री जाईबहार, थेरपिस्ट वृषाली पतंगे, मानसी बुंदेले, व्यावसायिक प्रशिक्षणाचे काम करणारे शोएब शेख यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. याशिवाय कम्युनिटी टीचर म्हणून कार्य करणाऱ्या आम्रपाली जाधव, राणी परदेशी, शमाबाला कौटकर, मिराज शेख, गिरिधर चव्हाण यांचाही सन्मान केला. मुलांना दैनंदिन जीवनातील कामे शिकवणाऱ्या सेविका मालनबाई बिरूटे, योगिता कुंजारे आणि रजिया शेख यांचाही यावेळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आरंभच्या संस्थापक अध्यक्ष अंबिका टाकळकर यांनी केले. कार्यक्रमासाठी अजय वाहुळ, रोहिणी बाविस्कर, किरण अंकुशे, गणेश वाघ आदींनी पुढाकार घेतला.