

technology sector job demand decline:
Sakal
नववर्षात देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण घटण्याचे चिन्हे असून कर्मचारी भरतीत मागील वर्षातील मंदीचा कल कायम राहण्याचे संकेत कंपन्यांनी दिले आहेत. नोकऱ्यांची संख्या वार्षिक २४ टक्क्यांनी घसरून सुमारे एक लाख पदांवर आली आहे. जानेवारी २०२१ पासून नोंदवलेली ही दुसरी सर्वांत कमी मागणी आहे. सध्याची मागणी २०२२ च्या सुरुवातीला दिसलेल्या उच्चांकापेक्षा जवळपास ६० टक्क्यांनी कमी आहे. ‘एक्सफेनो’ या कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.