UPSC Result 2025 : ‘यूपीएससी’त संभाजीनगरचे ‘तेजस्वी’ यश; देशातून पटकावला ९९ वा रॅंक, तिसऱ्या प्रयत्नात मारली बाजी
success story : यूपीएससी परीक्षेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वी देशपांडे हिने देशभरातून ९९ वा रॅंक मिळवला. तिसऱ्या प्रयत्नात मिळवलेल्या या यशामागे तिची इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम आहेत.
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात शहरातील तेजस्वी देशपांडे हिने देशभरातून ९९ वा रॅंक पटकावला. ठाम निर्णय, प्रचंड इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाने तिसऱ्या प्रयत्नात हे यश तिने मिळवले.