जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची
तेलंगण अभ्यास दौऱ्यासाठी निवड
-----
माजलगाव, ता. २ (बातमीदार) : समग्र शिक्षा आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय आविष्कार अभियान २०२५-२६ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा छत्रबोरगाव येथील चार तसेच शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेतील दोन अशा एकूण सहा विद्यार्थांची तेलंगण अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा छत्रबोरगावचे अशोक नागेश बेद्रे, श्रावणी सतीश जाधव, संस्कृती बालासाहेब जाधव, पृथ्वी रामेश्वर शिंदे या चार तर शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेतील तनुजा हनुमंत कोल्हे, दीपाली दिगंबर शेळके यांचा समावेश आहे. अभ्यास दौरा तीन सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना हैद्राबाद येथील विविध राष्ट्रीय संशोधन संस्था,विज्ञान केंद्र आणि ऐतिहासिक वास्तूंना प्रत्यक्ष भेटी देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या यशाबद्दल मुख्याध्यापक मिलिंद गरबडे, मंदा सारूक, जयश्री लोणीकर, ज्योती कोडगीरकर, संगीता राठोड, शीतल राठोड, संगीता शिंदे, सुनंदा पाचणकर, हिरा
मगर, शिवानी शेरकर, बाळासाहेब सोनसळे, शरद नायबळ, सुंदर काळे, नारायण भाळशंकर, चंद्रकांत यादव, बालासाहेब कांबळे, हनुमान शेरकर, शेख अब्दुल, प्रवीण बनसोडे, हसीब सौदागर, संतोष साळवे यांनी अभिनंदन केले आहे.