Loksabha Election 2024 : विद्यमान आमदारांना मताधिक्याचे टेन्शन! मताधिक्य घटल्यास विधानसभेला होऊ शकतो पत्ता कट

सध्या लोकसभेसोबत विधानसभा मतदारसंघाची चाचपणी होत असल्याने विद्यमान आमदारांचा लागणार कस.
Voting
Votingsakal

छत्रपती संभाजीनगर - लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघात तिरंगी लढत होत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार आणि इच्छुकांना आपल्या उमेदवाराला मतदारसंघातून मताधिक्य देण्याचे टेन्शन आहे. लीड न मिळाल्यास विद्यमान आमदारांना विधानसभेला पुन्हा तिकीट मिळविण्यात अडचणी येऊ शकतात.

सध्या लोकसभेसोबत विधानसभा मतदारसंघाची चाचपणी होत असल्याने विद्यमान आमदारांचा कस लागणार आहे. मतदारसंघात किती मते मिळाली, यावरूनसुद्धा पुढील राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत.

या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये शिंदे गटाचे तीन, भाजपचे दोन तर एक शिवसेनेचा (उबाठा) आमदार आहे. महायुतीकडे सध्या पाच आमदार असल्याने आमदारांच्या संख्येच्या बाबतीत त्यांचे पारडे जड आहे. आता पाच आमदार असल्याचे मतदारसंघातून मताधिक्य देण्याचे दडपण महायुतीवरील आमदारांवर जास्त आहे. शिवसेना (उबाठा)चा कन्नड येथे एकमेव आमदार आहे.

२०१९ मध्ये विधानसभेत कुणाला, किती मते?

 • मध्य विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांना ८२ हजार २१७ मते मिळाली होती, त्यांचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे नासेर सिद्दिकी यांना ६८ हजार ३२५, तर वंचितचे अमित भुईगळ यांना २७ हजार ३०२ मते मिळाली.

 • पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे यांना ९३ हजार ९६६ तर एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांना ८० हजार ३६ मते मिळाली होती.

 • पश्चिममध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट यांना ८३ हजार ७९२, अपक्ष राजू शिंदे यांना ४३ हजार ३४७, एमआयएमचे अरुण बोर्डे यांना ३९ हजार ३३६ तर वंचितचे संदीप शिरसाट यांना २५ हजार ६४९ मते मिळाली होती.

 • कन्नड मतदारसंघातून पूर्वीची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेचे (उबाठा) उदयसिंग राजपूत यांना ७९ हजार २२५, अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना ६० हजार ५३५ तर राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे यांना ४३ हजार ६२५ मते मिळाली होती.

 • गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब यांना १ लाख ७ हजार १९३ तर राष्ट्रवादीचे संतोष माने यांना ७२ हजार २२२ मते मिळाली.

 • वैजापूरमधून शिवसेनेचे रमेश बोरनारे यांना ९८ हजार १८३, राष्ट्रवादीचे अभय पाटील यांना ३९ हजार २० तर अपक्ष अकील शेख यांना २१ हजार ८३५ मते मिळाली.

महायुतीच्या पाच आमदारांची एकत्रित मते ४ लाख ६५ हजार

सध्या महायुतीकडे भाजपचे अतुल सावे, प्रशांत बंब, शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, रमेश बोरनारे हे पाच आमदार आहेत. या पाच आमदारांची २०१९ विधानसभा निवडणुतील एकूण मते ही ४ लाख ६५ हजार ३५१ होतात. यामध्ये कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांची मते मिळवली तर ती ५ लाख ४४ हजार ५७६ होतात. म्हणजे, २०१९ च्या निवडणुकीत युतीचे पारडे जड होते.

मात्र, आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले असून दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी झाल्या आहेत. मतांचे गणित आणि समीकरणेही बदलली. २०१९ च्या निवडणुकीएवढी मते जरी महायुतीच्या पाच आमदारांनी राखण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा आकडा हा ४ लाख ६५ हजार ३५१ एवढा होतो. मात्र बहुरंगी लढतीत मतांच्या विभाजनात कुणाला किती मते मिळाली हे चार जूनलाच कळेल.

इम्तियाज जलील यांना २०१९ मध्ये पडलेली मते

 • औरंगाबाद (मध्य) - ९९,४५०

 • औरंगाबाद (पश्चिम)- ७१,२३९

 • औरंगाबाद (पूर्व)- ९२,३४७

 • गंगापूर - ५६,०२३

 • वैजापूर - ३५,४६२

 • कन्नड - ३४,२६३

 • टपाली मते - २५८

 • एकूण - ३,८९,०४२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com