अविष्कारमध्ये तेरणाचे यश

अविष्कारमध्ये तेरणाचे यश
Published on: 
‘तेरणा’च्या विद्यार्थ्यांची ‘आविष्कार’साठी निवड धाराशिव, ता. ३ (बातमीदार) : शहरातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत संस्थास्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी केले. यंदा मानव्यविद्या, भाषा व ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, शुद्ध विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय शाखांतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले. महिला सुरक्षा स्मार्ट सिस्टीम, एआय आधारित इमारत तडे शोध प्रणाली, स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, फुटस्टेप इलेक्ट्रिसिटी जनरेशन, औद्योगिक पाइप निरीक्षण रोबोट, डिजिटल फसवणूक शोध प्रणाली, किसान सहायक, स्मार्ट पार्किंग, पिकांवरील रोग ओळख प्रणाली, स्मार्ट सिटी आदी संकल्पनांचा त्यात समावेश होता. स्पर्धेत एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पदवी स्तरावरील श्रुती अदमुटे, रोजिना मकानदार, सबा कुरेशी, ऋतुजा दराडे, सोहम दहितनकर, फैजान शेख, रयान मोमीन, समीर शेख, समृद्धी जाधव, सार्थक येणेगुरे, आस्था राजपूत व यशोदा घवाणे या १२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. पदव्युत्तर स्तरावरील सोहेल पठाण, ऐश्वर्या सक्राते, ऋचा धप्पाधुळे, अजित कलगते, विजय पाटील, जयश्री होउडे, संध्याराणी हजारे, किशोर हाके, ओंकार सारफळे, मयुरेश कुगावकर, विराज पाटील व सायली मुळगीर या १२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या २४ विजेत्यांची आठ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोलापूर-लातूर विभागीय ‘आविष्कार’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. समन्वयक डॉ. सुशीलकुमार होळंबे, सहसमन्वयक प्रा. रवींद्र गुरव यांच्यासह प्रा. डी.बी. ठाकूर, प्रा. डी.बी. भक्ते, प्रा. बालाजी चव्हाण, प्रा. ए.के. पिंपळे, प्रा. व्ही.एस. बोंदर, डॉ. आर.बी. ननवरे यांनी स्पर्धेसाठी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com