
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक शिक्षकांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्यांसाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक असतानाही अनेक शिक्षकांनी आजतागायत ही परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने सोमवारी (ता. २१) संबंधित शाळांकडून माहिती मागवली आहे.