
अनिल भाले
छत्रपती संभाजीनगर : संत सद्गुरू विठोबादादा महाराज यांनी श्री विठ्ठल भक्तीचा नंदादीप प्रज्वलित करून भक्तिमार्गाची शिकवण देता लाखो गुरूभक्तांचे जीवन उजळून टाकले. तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून सुरू असलेली ही श्रेष्ठ परंपरा गादीवरील प्रत्येक थोर सत्पुरूषांनी प्राणपणाने जपली. पंढरपुरातील फड परंपरेत चातुर्मासात रोज कीर्तनसेवेची चातुर्मास्ये महाराजांची एकमेव परंपरा आहे.