Chh. Sambhaji Nagar : संपूर्ण राज्यात लालपरीची संख्या वाढवावी

सर्वच विश्रांतिगृहात हव्या मूलभूत सुविधा, एसटी कर्मचाऱ्यांची अपेक्षा
लालपरी
लालपरीsakal

छत्रपती संभाजीनगर : एसटी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेत आणि योग्य दरांमध्ये प्रवाशांना नेऊन सोडणारी लोकवाहिनी आहे. सरकारने सुरू केलेल्या अमृत आणि महिला सन्मान योजनांमुळे एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे आता बसेसची संख्या आणि यांत्रिकी कर्मचारी वाढवावेत. तसे झाले तर एसटीला सोन्याचे दिवस येतील. शिवाय विश्रांतिगृहात आवश्यक त्या सुविधा द्याव्यात, चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे प्रोत्साहन भत्ता सुरू करावा, अशी अपेक्षा एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

एसटी महामंडळातील चालक, वाहकांसह अन्य सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रश्न जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’च्या कार्यालयात ‘सकाळ संवाद’ उपक्रम मंगळवारी (ता. पाच) झाला. कर्मचाऱ्यांसाठी टर्म इन्शुरन्स असला पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढावा, कर्मचाऱ्यांना ठरावीक बसेसनांच मोफत पास दिला जातो तो सरसकट बसेससाठी द्यावा.

ऑनड्यूटी मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपावर सहा महिन्यांत सेवेत घ्यावे, राज्य शासनाच्या वेतन धोरणानुसार सातवा वेतन आयोग लागू करून त्याची अंमलबजावणी व्हावी, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी तत्काळ द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

लालपरी
Sambhaji Nagar News: शैक्षणिक आरक्षणांच्या भूखंडांची ‘शाळा’

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राजेंद्र मोटे, बाबासाहेब साळुंके, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे शिवाजीराव बोर्डे पाटील, महेश बोचरे पाटील, तुकाराम गादू, एस. एस. ढगे, दीपक तुपे, मागासवर्गीय अधिकारी, पर्यवेक्षक वेल्फेअर असोशिएशनचे साहेबराव कसबे, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे दीपक कसबे यात सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या अशा

  • सातवा वेतन आयोग लागू करावा

  • २०१८ पासून आजपर्यंतचा जाहीर करण्यात आलेला महागाई भत्ता द्यावा

  • खासगी बसेस घेण्याऐवजी महामंडळाने स्वत:च्या तीन कार्यशाळांमध्ये बस बांधणी करून स्वत:च्या बसेस चालवाव्या

  • यांत्रिकी विभागात मनुष्यबळ खूपच कमी ते वाढवावे

  • अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालावा

  • भांडार शाखेला सुट्या भागाचा पुरेसा आणि वेळेत पुरवठा व्हावा

  • वैद्यकीय बिले देण्याचे दर १९९५-९६ मध्ये निर्धारित केलेले आहेत त्यात एकतर बदल करावा अथवा कर्मचाऱ्यांचे कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स काढावे

  • आगारातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना १५० रुपये आगार

शिवशाही, शिवाई, हिरकणी या बसऐवजी लालपरींची संख्या वाढली पाहिजे. खासगी बसेस आणल्या जाणार असल्या तरी त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालवण्यात याव्यात.

— शिवाजीराव बोर्डे पाटील

विद्यमान सरकारने एसटीला ऊर्जितावस्था दिली. कर्मचारी भरती करावी. चालक, वाहकांना वेळेवर गाड्या मिळाल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा करार करावा. चालक, वाहकांना त्या बसेसला जीपीएस लावून त्यांच्या कामाच्या तासाची गणना करून ओव्हर टाइम द्यावा.

— राजेंद्र मोटे

ता. १ एप्रिल २०१६ पासूनचा चार वर्षांचा वेतनवाढीचा करार अंतिम करावा. पाच हजार, चार हजार आणि अडीच हजाराची देण्यात आलेल्या वेतनवाढीतील तफावत दूर करण्यासाठी सरसकट सर्वांना ५ हजार रुपये वेतनवाढ करावी.

— साहेबराव कसबे

यांत्रिकी मनुष्यबळ वाढवावे. प्रवाशांना विमा संरक्षण आहे. मात्र, बसेसला विमा संरक्षण नाही. त्यामुळे बसचे नुकसान झाल्यास चालकांना दोषी ठरवून वसुली केली जाते. त्यासाठी विमा कंपनीकडून बसचा विमा काढावा.

— बाबासाहेब साळुंके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com