Sambhaji Nagar : चालकांच्या संपाचा शाळांनाही फटका

विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी पालकांची धावपळ
sambhaji nagar
sambhaji nagar Sakal

छत्रपती संभाजीनगर : ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपात मंगळवारी स्कूल बसचालकांनीही सहभाग घेतला होता. मात्र, शहरात पेट्रोलचा तुटवडा असल्यामुळे बुधवारी बहुतांश विद्यार्थ्यांसाठींच्या स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षा धावल्याच नाहीत. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांनी घटली.

ट्रक आणि टँकरचालकांनी पुकारलेल्या संपापाठोपाठ शहरातील स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनी देखील एकदिवसीय लक्षणीय संप पुकारला होता. परिणामी याचा फटका बुधवारी शालेय विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे सकाळपासून आपल्या पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी पालकांना चांगलीच कसरत करावी लागली.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये बिघाड;तीन तास बंद पडला पाणीउपसा

या संपामध्ये शहरातील जवळपास १,८०० स्कूल बस, व्हॅनचालक सहभागी झाले होते. अगोदरच शहरात पेट्रोलच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त होते. त्यात स्कूल व्हॅनच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची डोकेदुखी वाढली होती. पालकांच्या गाडीत पेट्रोल नसल्यामुळे अनेक विद्यार्थी मंगळवारी शाळेत पोचू शकले नाहीत.

या संपामध्ये शहरातील जवळपास १,८०० स्कूल बस, व्हॅनचालक सहभागी झाले होते. अगोदरच शहरात पेट्रोलच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त होते. त्यात स्कूल व्हॅनच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची डोकेदुखी वाढली होती. पालकांच्या गाडीत पेट्रोल नसल्यामुळे अनेक विद्यार्थी मंगळवारी शाळेत पोचू शकले नाहीत. तसेच ज्या स्कूलबसने मुलांना सकाळी शाळेत सोडले होते, त्यांनी देखील दुपारनंतर संपात सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी पालकांना चांगलीच धावपळ करावी लागली.

शहरात पेट्रोलचा तुटवडा, त्यात स्कूल बस, व्हॅन चालकांचा संप असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत गैरहजर होते. जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती.

- डॉ. सविता मुळे, मुख्याध्यापिका, शारदा कन्या मंदिर शाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com