
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी क्रांती चौकात सोमवारी (ता. २८) शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत कोकणवाडी, सिल्लेखाना, बाबा पेट्रोलपंप, आकाशवाणीकडून क्रांती चौकांकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. ऑक्टोबर हीटचा चटका, त्यात रस्त्यावरील धुळधाणीत तब्बल चार तास अगदी मुंगीच्या पावलांनी वाहने पुढे सरकत होती. यामध्ये दुचाकीस्वारांना अधिक त्रास झाला. दुपारी दोननंतर वाहतूक सुरळीत झाली.