
औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेत हातसफाई
औरंगाबाद - राज ठाकरे यांच्या सभेत गर्दीचा फायदा घेत तेथील नागरिकांचे पाकिट मारुन आलेल्या पैशांच्या वाटणीवरुन दोघांनी १४ वर्षीय साथीदाराच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केले. ही घटना १ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बुढीलेन परिसरा घडला. या प्रकरणात सिटीचौक पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना सहा मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी सोमवारी (ता. दोन) दिले. जुबेर खान जफर खान (२१) आणि अकबर खान रऊफ खान (४६, दोघे रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात इमरान खान आरेफ खान (वय २२, रा. अन्सार कॉलनी, ह. मु भडकल गेट) याने फिर्याद दिली. त्यानूसार, जखमी सुलतान इशा शेख हा फिर्यादीच्या मोठ्या भावाचा साला आहे. तर आरोपी जुबेर खान आणि अकबर खान हे दोघे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत.
फिर्यादी, फिर्यादीचा भाऊजी, जखमी सुलतान व त्याची आई असे सर्व जण भीक मागून उदनिर्वाह चालवितात. १ मे रोजी सायंकाळी फिर्यादी व सुलतान हे दोघे भडकल गेट परिसरात भिक मागत होते. त्यावेळी अकबर खान, जुबेर खान हे समीर पठाण याच्या रिक्षातून सभेच्या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी काही व्यक्तींची पाकिटे मारली. व आलेल्या पैशातून त्यांनी बुढीलेन येथील हॉटेलात जेवण केले. त्यानंतर झालेल्या वादानंतर जुबेरने चाकू काढून सुलतानच्या पोटात खुपसला. उपस्थित नागरिकांनी दोघा आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी युक्तीवाद केला.
Web Title: Theft In Raj Thakre Sabha At Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..