Khultabad News: खुलताबाद भद्रा मारोती मंदिर परिसरात दर्शनार्थींच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलेची पाच लाखांच्या सोन्याची पोत चोरी
Gold Theft: खुलताबाद येथील भद्रा मारोती मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेची साडेपाच लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरी झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
खुलताबाद : येथील भद्रा मारोती मंदिरात दर्शनानिमित्त होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत अज्ञातांनी महिलेची साडेपाच लाखांची सोन्याची पोत लंपास केली. ही घटना शनिवारी (ता. ९) दुपारी घडली.