Vadigodri News : वडीगोद्रीत स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न, चोरीचे साहित्य पोलीसाकडुन जप्त

Bank Robbery Attempt : वडिगोद्रीत स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला. बँकचे ऐवज, रोकड सुरक्षित राहिले. शेतात चोरीचे साहित्य आढळले. पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. सुरक्षा वाढवण्याची चर्चा झाली. तीन पथकांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे.
Bank Robbery Attempt

Bank Robbery Attempt

sakal

Updated on

दिलीप दखणे वडिगोद्री

वडिगोद्री : भारतीय स्टेट बँक शाखा वडिगोद्री येथे शनिवारी ता.14 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी बँक फोडण्याचा प्रयत्न केला मात्र या मध्ये सर्व रोकड, ऐवज ,सुरक्षित असल्याने खाते धारकांचा जीवात जिव आला आहे रविवार ता.15 रोजी सकाळी हि घटना उघडकीस आली.

या ठिकाणी बँक शेजारी असलेले ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल जवळ शेतात कटर,सिलेंडर, बैग, असे चोरीचे साहित्य आढळले, सदरील ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाच संशयित चोरटे असल्याचे दिसत आहे, सीसीटीव्ही रुमालाने चोरांनी झाकुन टाकले होते, सीसीटीव्ही कॅमेराला काळा रंग लावण्यात आला होता. या ठिकाणी गावात राखणदार करणारे गुराखा व ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष सोमनाथ काळे यांनी सतर्क राहिल्याने मोठा अनर्थ टळला आहे तसेच गोदी पोलिस यांचे रात्री गस्त या दरम्यान होते

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com