औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरात चोरट्यांनी फोडली तीन दुकाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shop broke

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरात चोरट्यांनी फोडली तीन दुकाने

औरंगाबाद - मुकुंदवाडी परिसरातील राजनगरमध्ये साई ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान चोरट्यांनी मंगळवारी (ता. तीन) मध्यरात्री फोडले. या दुकानातून ३०० ग्रॅम चांदी चोरीला गेली. त्याशिवाय चोरट्यांनी दोन किराणा दुकानांचे शटरही उचकटले. ही घटना बुधवारी (ता. चार) सकाळी उघडकीस आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

राजनगर भागात सोन्याच्या दुकानाच्या शेजारीच दोन किराणा दुकाने आहेत. या दुकानांमध्ये चोरी करण्यासाठी दोन चोरटे आल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता दोन चोरटे दुकानाचे शटर उचकटतांना व दुकानात चोरी करताना कैद झाले आहे. दोघांनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यातील एकाने निळ्या रंगाचा शर्ट परिधान आणि टोपी घातली होती. तर दुसऱ्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करुन दुकानातील फुटेज जप्त केले. सोन्याच्या दुकानदाराला रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले हते. मात्र, तो तक्रार देण्यासाठी आला नसल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नसल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.

Web Title: Thieves Broke Three Shops In Mukundwadi Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top