उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
Published on
तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी विभाग अडचणीत ​उमरगा, ता. १८ (बातमीदार) ः राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून नुकत्याच केलेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत उमरगा येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयातील तीन प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. यामुळे रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णालयात ‘हार्निया’ आणि सिझरियन शस्त्रक्रियेनंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर सिझेरियनसह इतर सामान्य शस्त्रक्रिया सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णालयात ‘फिजिशियन’ची जागा रिक्त असल्याने कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असूनही प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना सिझरियनसाठी इतरत्र पाठवावे लागते. दरम्यान, रुग्णालय प्रमुखाबाबत झालेल्या तक्रारींनंतर आमदार प्रवीण स्वामी यांनी बैठक घेऊन काही सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. - - ​बदली झालेले अधिकारी ​डॉ. आशा कदम (क्ष-किरण तज्ज्ञ): मिरा-भाईंदर येथे बदली ​डॉ. विनोद जाधव (बालरोग तज्ज्ञ): नळदुर्ग येथे बदली. डॉ. सिफाना तांबोळी (स्त्रीरोग तज्ज्ञ): माळशिरस (जि. सोलापूर) येथे बदली. - - सोनोग्राफी सेवा पूर्ववत असावी रुग्णालयात कमी दरात सीटीस्कॅन, सुविधा सुरू आहे. तसेच सोनोग्राफी मॅमोग्राफी  यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून याचा मोठा लाभ रुग्णांना होत होता. मात्र, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. आशा कदम यांच्या बदलीनंतर आता सोनोग्राफी विभाग पूर्णपणे अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. ही सेवा पूर्ववत सुरू राहण्यासाठी आरोग्य विभागाने येथे तातडीने रेडिओलॉजिस्टची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी रुग्णांकडून होत आहे. - -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com