
वाळूजमहानगर : नदीच्या पाण्यात कपडे धूत असताना अचानक तिसगावच्या नदीला पूर आला आणि त्यात वाहून जाणाऱ्या दोघींनी वाचविण्यात यश आले. मात्र, एक मुलगी पाण्यात वाहून गेली. सायंकाळी उशिरापर्यंत सदर महिलेचा शोध सुरु होता. ही घटना रविवारी (ता.११) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली.
हिरुबाई रघू जोगराणा (वय ५०), नीतू कालू जोगराणा (वय १७) असे पुरातून वाचलेल्या दोघांची नावे आहे. तर राधा नागरी सापडा (वय १४) असे असून वाहून गेलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूज परिसरातील तीसगाव येथून देवगिरी नदी वाहते. देवगिरी किल्ल्यापासून येणारी ही नदी तिसगाव, सिडको वाळूज महानगर ते पंढरपूर जवळ खाम नदीला मिळते. या नदीच्या पात्रात एएस क्लब जवळ राहणाऱ्या राजस्थानी महिला व दोन मुली अशा तीन जणी कपडे धूत होत्या.
रविवारी (ता.११) दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे या नदीला मोठा पूर आला. त्यामुळे कपडे धुणाऱ्या तिघी पाण्यात अडकल्या. एका झाडाचा सहारा घेत आरडाओरड केल्याने नागरिकांनी धाव घेत वाहून जाणाऱ्या महिला व एका मुलीला पकडले. मात्र, एक मुलगी वाहून गेली. मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. डी. साळुंके, एल. पी. कोले, दीपक गाडेकर, विजय कोथमिरे, परेश दुधे, मेनीनाथ जाधव, दिनेश वेकदोडे, जगदीश सलामाबाद, पी. के. चौधरी, सी. आर. पाटील, एस. जी. महाले, वाय. डी. काळे, यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या पुरात वाहून जाणाऱ्या हिरुबाई आणि नीतू यांना वाचविले. मात्र, राधा सापडा ही वाहून गेली.
पोलिसही बालंबाल बचावला
दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिला व मुलींना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल किशोर संजय गाडे हे पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा वेग जोराचा असल्याने ते पाण्यात बुडाले. सुदैवाने त्यांच्या कमरेला दोरी बांधलेले होती. यामुळे ते बालंबाल बचावले.
...तर मुलगी वाहून गेली नसती
आपत्ती व्यवस्थापनासाठी अद्यापही अत्याधुनिक सुविधा नाही. त्या असणे आवश्यक आहे. रविवारी झालेल्या दुर्घटनास्थळी ओडक्याचा सहारा घेऊन दोन मुलीसह एक महिला अशा तिघी जवळजवळ ४५ मिनिटे जीव मुठीत धरून थांबून होत्या. त्यांना वेळेवर मदत न मिळाल्याने त्यातील एक वाहून गेली. जर अत्याधुनिक सुविधा, यंत्रणा उपलब्ध असती तर कदाचित एक वाहून गेली नसती. जिल्हा प्रशासनाने अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी अत्याधुनिक साधनाचा वापर करावा, अशी मागणी तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.