Municipal Corporation Election : नगरसेवक व्हायचेय, मग दोनशे सदस्य करा!
Chh. Sambhajinagar : भाजपने महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी अडीच लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांना १५ जानेवारीपर्यंत २०० सदस्य नोंदवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुका मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे. या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे. यासाठी पक्षाने शहरात अडीच लाख सदस्य नोंदणीचे टार्गेट ठेवले आहे.