esakal | दहावी, बारावी बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या अर्ज भरण्याच्या प्रकियेला आजपासून सुरूवात
sakal

बोलून बातमी शोधा

2hsc_0

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावी परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले. २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता. दोन) ऑनलाइन भरता येणार आहे.

दहावी, बारावी बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या अर्ज भरण्याच्या प्रकियेला आजपासून सुरूवात

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावी परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले. २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता. दोन) ऑनलाइन भरता येणार आहे. त्यासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत मुदत असणार आहे. शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर खासगीरीत्या प्रवेशित होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

औरंगाबादेत ६९ कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३६ हजार ८०७ कोरोनामुक्त

ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. दहावीसाठी अर्ज करण्यासाठी http://from१७.mh-ssc.ac.in व बारावीसाठी http://from१७.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर प्रक्रिया करावी लागणार आहे. दोन ते २८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यासह तीन ते ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्याने मूळ अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क पोचपावतीच्या छायाप्रती, अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्रात जमा करावे लागणार आहेत. तर या केंद्रांना मंडळाकडे चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत.

विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, मूळ प्रत नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो, ऑनलाइन अर्ज भरताना ही कागदापत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत. शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. त्यासह विद्यार्थ्याला आपला मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अर्जावर देणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने अर्ज भरलेल्या अर्जाची प्रत त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संपर्क केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत. त्या संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांना करावयाची आहे. संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top