ऑक्टोबर हिटचा भाजीपाल्याला फटका

ऑक्टोबर हिटचा भाजीपाल्याला फटका
Published on: 
ऑक्टोबर हीटचा भाजीपाल्याला फटका पालेभाज्यांची आवक घटली; मेथीची जुडी २५, कोथिंबीर २० रुपयांवर छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : ऑक्टोबर हीटचा तडाखा आता भाजीपाल्याच्या बाजारालाही बसू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे पालेभाज्यांची आवक घटल्याने भावात वाढ झाली असून, मेथीची जुडी १५ वरून थेट २५ रुपयांवर पोचली आहे. कोथिंबीर २० रुपयांना मिळत आहेत. पालक, चुका, शेपू यांसह अन्य पालेभाज्यांच्या भावातही काहीशी वाढ झाली आहे. वांगी, भोपळा आणि श्रावण घेवड्याची आवक घटल्याने त्यांच्याही भावावर परिणाम झाला आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होत आहे. त्यामुळे शहरातील जाधववाडी येथील नवीन मोंढ्यातील मंडईत भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी, शहरातील औरंगपुरा, शहागंज, गुलमंडी, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी, शहानूरमिया दर्गा येथील किरकोळ भाजीपाला बाजारावरही त्याचा परिणाम दिसत आहे. काही भाज्यांचे भाव स्थिर असले, तरी अनेक भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. वांग्याचे भाव किलोमागे ६० रुपयांवरून ८० रुपयांवर गेले आहेत. भोपळा ४० रुपयांवरून ५० रुपये किलो झाला आहे. श्रावण घेवड्याची आवक घटल्याने त्याचाही भाव ८० रुपयांवरून १२० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. हिरवी मिरची, सिमला मिरची, गिलके, दोडके, वाल, कारले आणि गाजर यांचेही भाव किलोमागे ८० रुपये आहेत. ---- लसूण २५० ते ४०० रुपये किलो लिंबाच्या भावात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यापूर्वी १५० ते २४० रुपये किलो असलेले लिंबू आता १२० ते २०० रुपये किलोने विकले जात आहेत. मात्र, लसूण २५० ते ४०० रुपये किलो, तर अद्रक २४० रुपये किलोने विकली जात आहे. शेवगा १०० रुपये किलो, तर कंटुले २०० रुपये किलो आहेत. ---- * भाजीपाल्याचे आजचे भाव (प्रतिकिलो) बटाटे - २५ ते ३० रुपये कांदा - ६० रुपये भोपळा - ५० रुपये काकडी - ५० रुपये टोमॅटो - ५० रुपये वांगे - ८० रुपये भेंडी - ६० रुपये गाजर - ८० रुपये कारले - ८० रुपये कोबी - ५० रुपये फ्लॉवर - ८० रुपये वाल - ८० रुपये गिलके - ८० रुपये हिरवी मिरची - ८० रुपये सिमला मिरची - ८० रुपये दिलपसंद - ८० रुपये लिंबू - १२० ते २०० रुपये दोडके - ८० रुपये शेवगा - १०० रुपये अद्रक - २४० रुपये लसूण - २५० ते ४०० रुपये श्रावण घेवडा (बिन्स) - १२० रुपये कंटुले - २०० रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com