संजीवनी महाविद्यालयात
तलवारबाजी स्पर्धा उत्साहात
---------------
मुलांमध्ये कवठा, मुलींमध्ये विद्यापीठ कॅम्पस विजेता
चाकूर, ता. २९ (बातमीदार) ः चापोली (ता.चाकूर) येथील संजीवनी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन मुले व मुलींच्या तलवारबाजी क्रीडा स्पर्धा नुकत्याच झाल्या या स्पर्धेत विविध महाविद्यालयांमधून मुलांच्या १३ आणि मुलींच्या १४ संघानी सहभाग नोंदविला होता.
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय खेळाडू डॉ. पल्लवी देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. धनंजय चाटे होते. प्रा. डॉ. अभिजित मोरे, उपप्राचार्य रमेश गुट्टे, प्रा. डॉ. मनोज पैजंगे, प्रा. डॉ. राहुल वाघमारे, प्रा. डॉ. हेमंत शिंदे, युसूफ शेख यांची उपस्थिती होती. मुलांच्या विभागात नांदेडच्या कवठा येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालय संघाने उपविजेतेपद मिळवले, तर संजीवनी महाविद्यालयाच्या तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या विभागात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसच्या संघाने विजेतेपद मिळविले. तर नांदेडच्या एस. जी. जी. एस. अभियांत्रिकी महाविद्यालय संघाने द्वितीय, अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालय संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेसाठी डॉ. संतोष कोकिळ, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. निरंजन आखमारे, राहुल चंदेल, अशफाक सय्यद, संगमेश्वर शिंदे, गणेश पांचाळ, प्रा. गोविंद फड, डॉ. नारायण जायभाये, प्रा. संदीप मुंडे, प्रा. रणजीत चव्हाण, प्रा. उत्तम भालेराव, प्रा.डॉ. रवींद्र भताने, डॉ. रमाकांत आरदवाड यांनी पुढाकार घेतला.
-------