गुरुनानक जयंतीनिमित्त नांदेड-बिदरदरम्यान विशेष रेल्वे

गुरुनानक जयंतीनिमित्त नांदेड-बिदरदरम्यान विशेष रेल्वे
Published on: 
नांदेड-बिदरदरम्यान विशेष रेल्वे --- श्री गुरुनानक जयंतीनिमित्त भाविकांसाठी २३ व २५ नोव्हेंबरला धावणार नांदेड, ता. १६ : श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बिदर येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमांना जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने हजूर साहिब नांदेड ते बिदरदरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे २३ व २५ नोव्हेंबर रोजी धावणार असून, नांदेडसह मार्गावरील विविध स्थानकांतील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. गाडी क्रमांक ०७६१५ ही विशेष रेल्वे २३ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता हजूर साहिब नांदेड येथून सुटून सायंकाळी ४ः३० वाजता बिदर येथे पोचेल. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६१६ ही २५ नोव्हेंबरला दुपारी ३ः३० वाजता बिदर येथून सुटून रात्री ११ः३० वाजता नांदेडला पोचणार आहे. या रेल्वेला पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, कमालनगर आणि भालकी येथे थांबे देण्यात आले आहेत. एकूण २१ डब्यांच्या या रेल्वेत तीन एसी चेअर कार, पाच एसी थ्री टियर, सात स्लीपर, चार जनरल आणि दोन लगेज-कम-ब्रेक व्हॅन असतील. या विशेष रेल्वेसाठी नियमित भाड्याच्या १.३ पट दराने विशेष भाडे आकारण्यात येणार आहे. सण आणि धार्मिक उत्सवांच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांचे नियोजन केले जाते. भाविक आणि प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने केले आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.